Posts

Showing posts from October, 2007

Dombivali Fast...

खूप दिवसांची इच्छा होती डोँबिवली फास्ट मूवी बघायची . पहिल्यांदा या मूवी बद्दल ऐकले होते पंकज कडून MBP ऑफिस मधे जेव्हा तो डोंबिवलीच्या थिएटर मधे जाऊन मूवी बघून आला होता . नंतर या मूवी बद्दल न्यूज़ पेपर मधे खूप काही वाचले , या चित्रपटाबद्दल खूप काही ऐकले पण पाहायला नाही मिळाला. बोस्टन मधे असताना ऑनलाइन पहायचा प्रयत्न केला पण यश काही आले नाही. पण आज माझ्या प्रयत्नाना अखेर यश आलेच. मूवी बघताना तसा त्रासच होतो. नायकाची होणारी घुसमट बघवत नाही. सगळे खरे आहे, सत्य आहे. आपण या गोष्टी आजुबाजुला नेहमी बघतो पण आपण फक्त बघतच राहतो . ती घुसमत जेव्हा बाहेर येते ती अशी, त्या नायका सारखी. लाच देणे, देत नसलो तरी ती आपल्या समोर होणारी पाहणे पण त्या विषयी आवाज नाही. अशा बर्याच समस्या, दुःखे, अपेक्षा यांची होणारी घालमेल म्हणजे डोँबिवली फास्ट !!!! या चित्रपतात बरेच ह्रदय हेलावणारे प्रसंग आहेत त्यापैकीच एक जो आजकाल सगळ्यांनाच परिचयाचा आहे . " माती, त्यावर शेणाने सारावुन मग रांगोली, चित्र असं होतं! मग तिथे डांबर टाकून सुरु...