Posts

Showing posts from 2008

भूत

काही दिवसांपूर्वी एक हॉरर पिक्चर बघितला " १४०८ " ... पिक्चर रात्री कोणी घरी नसताना १२ ला चालू केला ... बघू म्हटलं आपण किती धाडसी आहोत ते .... लाईट बंद केला ... सगळीकडे अंधार आणि भयान शांतता ... आणि मी पिक्चर सुरू केला ... पिक्चर चालू करून १० मिनिटे पण झाली नसतील मी लगेच लाईट ऑन केला घाबरून ... भयानक होते ते सगळं ... भूत , प्रेत , रक्त , ' झी हॉरर शो ' मधलं काळं मांजर आणि मराठी पिक्चरमधे दाखवतात ती कोल्हेकुई ... बाप रे ... It was really scary!! पण एक मात्र आहे मी पिक्चर बघून complete केला and at last I proved I am brave yeeeeee ;) पिक्चर संपला पण मला झोप येत नव्हती ... लहानपणी पाहिलेलं पहिलं भूत आठवत होतं ... वय वर्षे १२ ... त्यादिवशी शनिवार होता ... सकाळची शाळा ... शाळेतुन ११ वाजता घरी परत ... मामाने लगेच शेतावर पाठवले आजोबांसाठी जेवण घेउन ... शेताकडे जाताना रस्त्यावर एक थडगे येतं .... माझ्या मित्राने मला सांगितलं की त्यामधे एक पांढरे केस असणाऱ्या म्हाताऱ्या ...

आब्या...

असाच एक घडलेला किस्सा कालच माझ्या रूम पार्टनर्सना सांगितला ... वाटलं तुमच्याशीही share करावा ... त्यावेळी मी सातवीत होतो ... मामांच्या गावापासून ३ किमी अंतरावर असणाऱ्या सडोली गावाच्या हाइस्कुलमधे शिकत होतो ... संध्याकाळचे ५ . ३० झाले होते ... शाळेतुन मी जस्ट घरी पोचलो होतो .... सायकल असल्यामुळे लवकर पोचलो ... सायकल स्टँड वर लावली आणि घरात जाण्या ऐवजी मी घरासमोरच्या कट्ट्यावर बसलो ... तो पर्यंत आमचा शेजारचा आब्या ( म्हणजे अभिजीत ) आला ... आब्या ... एक नम्बरचा कार्टून ...!!! आगाऊ ... कोल्हापुरी भाषेत सांगायचे झाले तर एकदम वांड पोरगा ... ५ वर्षाचा होता पण करामती करण्यात पटाईत ... नाकाचा शेंडा नेहमी काळा ... दिवसभर मातीत आणि गटारात खेळायचा ... एकदा त्याला मी गटारातुन बाहेर काढले तर त्याने उलटी बोंब मारली आणि त्याच्या आईने घरातुनच एकदम अस्सल गावरान शिवी हासडली मला ... " अरे कोण हाय तो माझ्या सोन्याला रडवतोय ... त्याला "Beeeeeeeeeeeeep" झालं ते ....!! " (शिव्या cen...