आखरी रास्ता
नेहमीप्रमाणे आम्ही ऑफिस मधून दुपारी जेवायला घरी आलो ... जेवण ऊरकुन १ . २७ ची ७१ नंबरची बस ऑफिससाठी पकडण्यासाठी बस स्टॉपला थांबलो ... काही नेहमी दिसणारे चेहरे तर काही ८ - ९ महिन्यामधे कधी न बघितलेले चेहरे बस मधे चढ़त होते ... मी आपला खोटे खोटे हसत त्या खडूस बस ड्राईवरला बसचा पास दाखवून आतमधे चढलो आणि बाकीच्या चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या लोकांचे निरीक्षण करू लागलो ... बस मधे चढणाऱ्यांच्या मधे ६० ते ८० वयाची लोकं जास्त होती जी त्यातली बरीचशी वाटेत येणाऱ्या वृद्धाश्रमात उतरणार होती ... आम्ही आपले शेवटच्या सीट वर बस्तान बसवलं होतं .... आणि नेहमी सारखी मराठी मधे त्या जर्मन लोकांच्या विषयी ' विशेष टिपण्णी ' देण्यास सुरुवात केली होती ... ' या लोकाना बहुतेक कपड्यांची अॅलर्जी असावी ' असा नेहमीचा डायलॉग त्या सुंदर गोऱ्या मुलीकडे बघत मी मारला ... सगळे फिदिफिदी हसले पण चंदू (चंद्रकांत ) आपला पायावर पाय चढवून गपचुप बसला होता वयस्कर माणसासारखा...!!! बस चालू झाली पण jus...