"जाहीर निषेध" म्हणे !!
परवा एका मित्राने व्हाट्सएप्प ग्रुपवर एक पोस्ट टाकली...त्यामध्ये एक फोटो होता ज्यामध्ये 'उरी' येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत भारतीय जवानांवर केलेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्यावर 'जाहीर निषेध' करणारी काही मंडळी होती.. खूप इंटरेस्टिंग फोटो होता... २७ लोक होती त्यामध्ये फक्त एका महिलेचा समावेश होता... काही लोकांचे चेहरे असे होते कि "काय चाललंय काय माहित"... काही जण फोटो सेशन आहे म्हणून जमा होते आणि काहीजण "वडापाव किंवा मिसळ कधी मिळणार" असा अविर्भाव चेहर्यावर घेऊन होते... पण होर्डिंग बघून डोक्यात कळ गेली... आणि प्रश्न पडला कि "या लोकांना काही अकला आहेत कि नाहीत?", कसली पोस्टर घेऊन तुम्ही निदर्शन करताय याच काही भान आहे कि नाही ... सुरवातीला "जाहीर निषेध " ... ओके ठीक आहे... पण त्यानंतर मोठया ठळक अक्षरात पहिल्यांदा "मोदी सरकारचा जाहीर निषेध" आणि मग त्यांनंतर "पाकिस्तानचा जाहीर निषेध"? प्रश्न: आधी मोदी सरकार आणि त्यानंतर पाकिस्तानचा निषेध का? आधी पाकिस्तानचा निषेध आणि त्यानंतर सरकारचा निषेध का नाही? यावरून...