Dombivali Fast...

खूप दिवसांची इच्छा होती डोँबिवली फास्ट मूवी बघायची. पहिल्यांदा या मूवी बद्दल ऐकले होते पंकज कडून MBP ऑफिस मधे जेव्हा तो डोंबिवलीच्या थिएटर मधे जाऊन मूवी बघून आला होता. नंतर या मूवी बद्दल न्यूज़ पेपर मधे खूप काही वाचले, या चित्रपटाबद्दल खूप काही ऐकले पण पाहायला नाही मिळाला. बोस्टन मधे असताना ऑनलाइन पहायचा प्रयत्न केला पण यश काही आले नाही. पण आज माझ्या प्रयत्नाना अखेर यश आलेच.

मूवी बघताना तसा त्रासच होतो. नायकाची होणारी घुसमट बघवत नाही. सगळे खरे आहे, सत्य आहे. आपण या गोष्टी आजुबाजुला नेहमी बघतो पण आपण फक्त बघतच राहतो . ती घुसमत जेव्हा बाहेर येते ती अशी, त्या नायका सारखी. लाच देणे, देत नसलो तरी ती आपल्या समोर होणारी पाहणे पण त्या विषयी आवाज नाही. अशा बर्याच समस्या, दुःखे, अपेक्षा यांची होणारी घालमेल म्हणजे
डोँबिवली फास्ट!!!!

या चित्रपतात बरेच ह्रदय हेलावणारे प्रसंग आहेत त्यापैकीच एक जो आजकाल सगळ्यांनाच परिचयाचा आहे .

" माती, त्यावर शेणाने सारावुन मग रांगोली, चित्र असं होतं!
मग तिथे डांबर टाकून सुरु झालं हे सगळे !
हव्यास.... हव्यास जडला.... अधिक जास्तीचा हव्यास जडला...
अंगण वावर पुरेना म्हणून नोकरी धंदे सुरु झाले ...
नोकरीत पगार पुरेना, धन्द्यात नफा पुरेना, मग तो मिळवणे सुरु
झाले ...
पगार वाढीसाथी संप, दमदाट्या , मोर्चे....
नफा वाढवण्या साथी खोटेपणा, चिरिमिरी, चोरी........
शेवाळ वाढतच गेले...................!!!!!
दलादलीत फसत गेले सारं...............!!!!!!!

छान लिहायचो, चित्रे काढ़ायचो
पण मग पैसे हवेत... स्थिरता म्हणून बैंक मधे ...
B.Com. पर्यंत एवढे वाचलो, एवढे शिकलो
पण पुढे काय तर लेजर भरा, परिपत्रिके लिहा
जेवढा न्ह्यालो आधि, तेवढाच कोरडा होत गेलो...
थेंब सुधा राहीला नाही ओलाव्याचा दाखवायला सुधा....
एका रेषेत उभे रहा, एका रेषेत लिहा....
एक दमात पदवी मिळवा, एका दमात कायम व्हा ...
एका इच्छेसाठी लग्न करा अणि ती दुहेरी करण्यासाठी मुले जन्माला घाला....
एक एक करून अनेक गोष्टी करा आणि मग एकदा मरा.......!!!!!!!
म्हणजे एकाकडून एकीकडे एकटे यायचे, एकटे जायचे अणि मधे हा साला जीवघेणा प्रवास...........!!!
मग हा प्रवास सरळ नको का? मनासारखा नको का?
अरे ठरवलं ना सगळ्यांनी नियम करायाचे पाळायचे तर मोडायची घाई का?
सगळ्यांनी मिळून खायचे की सगळ्यांचे आपणच खायचे??
सग
ळ्यांना शिस्त नको तर व्हा सगळ्यांनी बेशिस्त व्हा.....!!!
लाज सोडायची तर सगळ्यांनी
सोडायची एकट्याने कशाला ... एकट्यालाच कशाला ते ओझं .....!!!
जगु आणि जगु दया हा जर नियम नको असेल तर मग सगळ्यांनी मिळून ठराव करुया ... मारू आणि
मारुया...
सगळ्यानी मारू अणि सांगू त्या विधात्याला नाही आवडला हा तुझा खेल ... नाही आवडला..."


Comments

Popular posts from this blog

पाऊस

You spend more time with nature, you do more realise what you miss more...

विज्ञान काय सांगतं A1 आणि A2 दूधाबद्दल? What science tells you about A1 and A2 milk?