ब्लॅक फ्रायडे.........!
शुक्रवारची निवांत सकाळ... शुक्रवार म्हणजे थोडं निवांतच म्हणायला हवं... प्रत्येक Software Engineer या दिवसाची वाटच बघत असतो... माझा एक मित्र तर मला न विसरता प्रत्येक सोमवारी विचारतो, "अरे... Friday कधी येणार रे?". आणि मी न विसरता त्याला एकच उत्तर देतो, "काय रे... सोमवारीच काय विचारतोस.. Friday कधी येणार म्हणुन" तर अश्या वीकेंड मूडमधे सकाळी मी ऑफिसमधे पोचलो... नाष्ता-पाणी झालं आणि नेहमीची कामे सुरु केली... माझी colleague लंडनला पहिल्यांदा ऑन-साइट चालली होती.. तिला तिथे लागणार्या गोष्टींची लिस्ट बनवुन दिली... दुपार झाली...अचानक माझी एका ट्रेनिंगमधे भेटलेली मैत्रीण दिसली... सेजल... ट्रेनिंगनंतर ती एका दुसर्या ऑफिसमधे शिफ्ट झाली होती... त्यामुळे आम्ही ट्रेनिंगनंतर पहिल्यांदाच भेटणार होतो. ती दरवाज्यातुन आत आली.. तिचे माझ्याकडे लक्ष नव्हते... तिचा चेहरा चिंतातुर दिसत होता.. सेजल आणि चिंता यांचा दूरदूरचा संबंध नाही याची मला कल्पना होती... पण यावेळी तिच्या चेहर्यावरचे भाव काळजीत टाकणारे होते. हाक मारण्यासाठी 'सेsss' एवढच बोलु शकलो आणि गप्प झालो... ते भाव माझ...