ब्लॅक फ्रायडे.........!

शुक्रवारची निवांत सकाळ... शुक्रवार म्हणजे थोडं निवांतच म्हणायला हवं... प्रत्येक Software Engineer या दिवसाची वाटच बघत असतो... माझा एक मित्र तर मला न विसरता प्रत्येक सोमवारी विचारतो, "अरे... Friday कधी येणार रे?". आणि मी न विसरता त्याला एकच उत्तर देतो, "काय रे... सोमवारीच काय विचारतोस.. Friday कधी येणार म्हणुन" स्मित
तर अश्या वीकेंड मूडमधे सकाळी मी ऑफिसमधे पोचलो... नाष्ता-पाणी झालं आणि नेहमीची कामे सुरु केली... माझी colleague लंडनला पहिल्यांदा ऑन-साइट चालली होती.. तिला तिथे लागणार्‍या गोष्टींची लिस्ट बनवुन दिली... दुपार झाली...अचानक माझी एका ट्रेनिंगमधे भेटलेली मैत्रीण दिसली... सेजल... ट्रेनिंगनंतर ती एका दुसर्‍या ऑफिसमधे शिफ्ट झाली होती... त्यामुळे आम्ही ट्रेनिंगनंतर पहिल्यांदाच भेटणार होतो. ती दरवाज्यातुन आत आली.. तिचे माझ्याकडे लक्ष नव्हते... तिचा चेहरा चिंतातुर दिसत होता.. सेजल आणि चिंता यांचा दूरदूरचा संबंध नाही याची मला कल्पना होती... पण यावेळी तिच्या चेहर्‍यावरचे भाव काळजीत टाकणारे होते. हाक मारण्यासाठी 'सेsss' एवढच बोलु शकलो आणि गप्प झालो... ते भाव माझ्या मनात अनेक शंका निर्माण करत होते... मी तिला हाकच मारु शकलो नाही... ते भाव मला एका वेगळयाच तंद्रीमधे घेऊन गेले.... ट्रेनिंगचे दिवस डोळ्यासमोरुन ओझरु लागले...

साधारण ३ महिन्यापुर्वीची गोष्ट... ट्रेनिंगचा पहिला दिवस.. सेजलची एन्ट्री सगळ्यांच्या नजरेत आणणारी होती... अहं तसे नव्हे... यावेळी पब्लिक त्या मुलीच्या चेहर्‍यापेक्षा तिच्या बुटांकडे बघत होती.. मुलं वापरतात तो वुडलँडचा ट्रेकिंगचा बूट ज्याचे सोल कमीत कमी ३-४ इंच मोठे असतं, त्याचा ठॉक ठॉक आवाज करत त्या मॅडमची स्वारी आमच्या cubical मधे.. सोमवारीच इन-फॉर्मल ड्रेसमधे आली होती... सगळ्यांच्याकडे कपाळावर आठया पाडुन बघत होती...Resource manager आमच्या शेजारच्या cubical मधे बसतात... त्यांच्याकडे तर खुन्नस देऊन बघत होती... तिला या अगोदर कधीच बघितलं नव्हतं...तिचा अधुन मधुन फोन खणखणायचा... फोनवर तर तिच्या बॉयफ्रेंडला जरा कमी झाडायची ती... बिचारा... जयचे जरा जास्तच लक्ष होते तिच्याकडे.. जय माझा जु. सहकारी.. त्याच्याकडुनच कळालं तो फोनवाला तिचा बॉयफ्रेंड आहे ते.. सगळ्यांची ओळख करुन घेताना कळालं की पुण्याहून तिची बदली केली आहे... आणि तिच्या मूड्वरुन कळत होतं की हे सगळं तिच्या मनाविरुद्ध चाललं आहे. पहिले २ दिवस तर कुणाशी बोलली आठवत नाही.. जसे दिवस पुढे चालले तशी ती आमच्याबरोबर मिळुनमिसळुन वागु लागली... ती माझ्या शेजारीच बसायची त्यामुळे आमची जास्त ओळख होऊ लागली... जेव्हा जेव्हा रिकामा वेळ मिळु लागला तेव्हा तेव्हा ती कशी कंटाळली आहे या सगळ्या प्रकाराला हे ती सांगायची... तिचा मागचा २ वर्षाचा कामाचा अनुभव आणि मिळणारं प्रशिक्षण याचा काडीचा पण संबंध नाही हे पुन्हा पुन्हा सांगायची... पण तिचं कोणीही (कोणीही म्हणजे तिचे बॉस लोक) ऐकत नाही म्हटल्यावर तिची खुप चिडचिड होत होती... तिचे सगळे मित्र-मैत्रिणी पुण्यामधे होते त्यामुळे आमच्या ऑफिसमधे ती एकटी पडली होती... Total Frustoo... ती नेहमी मुलांच्यासारखे कपडे घालायची... गळ्यात लॉकेट.. हाताच्या मनगटावर काळा दोर... टॉमबॉय एकदम... एक दिवस ती वूड्लँडचा बूट घालुन आलेली नाही हे बघुन (म्हणजे मोका साधुन डोळा मारा) विचारलं, "तु नक्की मुलगीच आहे ना?", असं म्हणाल्यावर ती हसायला लागली... पोरगी हुश्शार होती..कळालं तिला मला काय म्हणायचे होते ते... त्याच्या पुढच्याच दिवशी ती अशी काही मेक-उप आणि ड्रेस घालून आली की बस्स...हमारा cubical गार्डन गार्डन हो गया..!! ओळख न दाखवणारे ऑफिसमधले सहकारी आता माझ्या शेजारी येऊन गप्पा मारु लागले... पुर्ण ट्रेनिंग बॅच एकत्रच दुपारचं जेवायला जायचो.. तिला लंच ब्रेकमधे हळुच सांगितलं, "बये, तु नेहमीसारखीच ये... असं मुलींसारखं वागणं बरं नाही डोळा मारा ". मला म्हणते, "हेच कारण आहे मी अशी मुलांसारखी कपडे घालुन येते". मला 'भापो' झाला. अशी ही सेजल...!

ट्रेनिंगची २ आठवडे संपली... एक दिवस ती माझी खेचत होती... त्या ट्रेनिंगमधे आणखी काही मुली होत्या... त्यातील एका मुली वरुन ती मला चिडवत होती...
"चल आज तेरा उस लडकी के साथ टाका भिडाते हैं.."
मी," ओय... क्या बोल रही है... लडकीयोंको ऐसी भाषा शोभा नहीं देती."
ती,"वोह छोड.. पसंद है की नही?"
"चुप ना... मुझे काम करने दे.. सुबह से कोई मिला नहीं क्या?"
"अरे, वोह अच्छी लडकी है", डोळे मिचकत बोलली.
"तुने क्या शादी.कॉम खोला है क्या?"
"नहीं... सेजल Matrimonial... ही ही"
"नेक्स्ट प्लीझ".
तोपर्यन्त सगळी बाकीची पब्लिक या इंटरेस्टींग विषयामधे सामील झाली होती... आता माझी काही खैर नाही असं समजताच मी तिथुन कल्टी मारली...

ट्रेनिंगचा शेवटचा दिवस... या दिवसानंतर सगळे वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करणार होते... मला ट्रेनिंग संपायच्या अगोदरच प्रोजेक्ट मिळाला होता.. त्यामुळे मी त्यांना प्रोजेक्ट मधुन वेळ काढुन भेटायला गेलो होतो... काही लोकांना त्यांना पाहिजे तसा प्रोजेक्ट मिळाला नसल्यामुळे थोडे नारा़ज होती.. त्यांना cheer up करण्यासाठी मग मीच थोडा धोका पत्करुन सेजलला Matrimony प्रकरणावरुन छेडलं.. "कितने टाके भिडाए रे..??", मी. आणि मग सगळेच सुरु झाले.. पण ते प्रकरण माझ्यावरच शेकलं... सगळी पब्लिक माझ्या मागे हात धुऊन मागे लागली...एका तिसर्‍या मुलीवरुन चिडवायला सुरुवात केली.. पुन्हा तेच संवाद.. "अर्रे वोह अच्छी है... तेरा टाका भिडाते है...blah blah..."
सेजल म्हणाली, " बता तुझे कौन पसंद है?"
"अर्रे यहां पे कोई अच्छी लडकी है क्या??", मी.
"तु बोल तोह सही...नयी बॅच आयी है आज.. वोह लडकी देख... अच्छी लगी??", सेजल एका मुलगीकडे बोट दाखवत बोलली. प्रकरण आणखी वाढणार असं लक्षात आल्यावर मी म्हणालो," सेजल.. मुझे तुम ही पसंद हो..." तिच्याकडे वळुन फिल्मी स्टाईल मधे डायलॉग मारला...अस बोलल्यावर सेजल भांबावुन गेली... काय प्रतिक्रिया द्यायची कळेनाच तिला...१८० अंशात डायरे़क्ट वळली... बाकीची पब्लिक ही ही करत होती.. "तुम तो एकदम पागल हो... crazyy" स्मित सेजल म्हणाली, आणि गायब झाली तिथुन...सेजलची फजिती बघुन सगळे हसायला लागले... त्या हश्यामधे आमचा Resource manager कधी सामील झाला कुणालाच कळालं नाही... सगळ्यांच्या लक्षात आल्यावर मात्र सगळेच ९२११ झाले.

ट्रेनिंग संपलं... सगळे पसरले... सेजलला पण चांगला प्रोजेक्ट मिळाला...सुरुवातीला कधी कधी मेलामेली झाली आणि काही दिवसानंतर सगळंच बंद.. सगळे आपाआपल्या कामात गुंग झाले...
एक दिवस आमचे Resource Manager भेटले.. कसं चाललेय काम इत्यादी इत्यादी प्रश्न विचारल्यावर म्हणतात, "क्या रे.. तेरा टाका भिडा की नही किसी के साथ? ;)"
मी, "क्या सर.. आप भी मेरी खिंचने लगे सेजल की तरह" .

धप्प.. कुणीतरी मला धक्का दिला... मी तंद्रीतुन जागा झालो... मागे सेजल होती... म्हणाली,"कहां खो गये हो"
क्षणाचा विलंब न लावता मी,"तेरी यादों में"
"अरे यार.. मेरा वोह वूड्लँड का शुज भूल गयी... तेरे को जरूरत है उसकी ;)"
"ही ही"
सेजल थोडी गंभीर होत म्हणाली, "सुन ना... मुझे एक बात बतानी है तुम्हे"
"काय झालं?.....ह्म्म.. क्या हुआ??", मराठी तिला कळत नाही लक्षात आल्यावर हिंदीमधे प्रश्न फेकला.
"यहां नहीं बता सकती"
मला आता भितीच वाटु लागली. आम्ही बाहेरच्या व्हरांड्यात आलो. तिने मला सांगितले की तिला HR मॅनेजरने बोलावलय.
मी,"किस लिए?"
"मुझे लग रहा है मेरा आज आखरी दिन है यहां पे"
"पागल है क्या.. ऐसे कैसे हो सकता है.. अभी तुम प्रोजेक्ट में Billable हो... " प्रोजे़क्टमधे जर रिसोर्स बिलेबल असेल तर सिक्युरिटी जास्त असते असा सर्वांचा योग्य समज आहे...
"वोह तो है.. बट मुझे वोह फीलिंग आ रही है", सेजल.
"तु मॅनेजर से मिली क्या?"
"अभी तक नही... ३ बजे मिलने को बोला है"
"फिर ऐसे कैसे बोल सकती हो तुम्हे वोह निकाल देंगे.. कुछ काम रहेगा तुझसे.. तु पुणे से आयी हो ना तोह फिर वोह कुछ deputation का मामला रहेगा" मी तिची समजुत घालत होतो...ती हो म्हणत HR कडे गेली.

मी खुप अस्वस्थ झालो... कामात काहीच लक्ष लागत नव्हतं... सारखं HR च्या केबिन कडे लक्ष जात होतं. HR मधल्या एका मित्राला फोन करुन विचारले की, "खरच आपली कंपनी लोकांना ले ऑफ करत आहेत काय रे?". माझ्या मनातली शंका त्याला विचारली..त्याने सांगितले की, "Radar is on... Be careful...!"

तरी पण मी आशा सोडली नव्हती.... मी वाट बघत होतो... २ तास झाले.. सेजलचा पत्ताच नव्हता.. काही वेळानंतर सेजल दिसली पण ती एकटी नव्हती.. तिच्याबरोबर HR मधला एक जण होता... तिने माझ्याकडे बघितले आणि ऑफिसच्या बाहेर येण्यासाठी खुणावले.... मी माझा PC लॉक करुन बाहेर पडलो.. HR तिला दुसर्‍या ऑफिसमधे घेऊन गेला होता... आतमधे जाताना सेजलच्या गळ्यात ऑफिसचा बँड होता...पण जेव्हा ती बाहेर पडली तेव्हा मात्र तिच्या हातात फक्त एक पेपर दिसला... HR यावेळी पण तिच्या सोबत होता.... मी तिला थांबण्यासाठी बोललो पण HR ने तिला नंतर बोला असं सांगितले...तो तिला ऑफिसच्या आवाराबाहेर घेऊन जात होता... तिला मुख्य दरवाज्याबाहेर सोडण्यासाठी आणि तिने ऑफिसमधल्या कोणाही सहकार्‍याशी बोलु नये याची काळजी घेण्यासाठी तो तिच्यासोबत होता याची जाणीव झाली... येवढ्या प्रकारानंतर माझी आता मात्र खात्री झाली की सेजल ही सध्याच्या मंदीच्या लाटेमधली एक बळी आहे.... सेजलची नोकरी गेली... It was complete shock...२-३ वर्षे पुर्ण झालेल्या लोकांच्या नोकरीवर गदा आली होती... एका पाठोपाठ ३-४ माझ्या ओळखीचे लो़कं त्या HR बरोबर बाहेर जाताना पाहिलं... संध्याकाळी ५ च्या दरम्यान दुसरा शॉक बसला... माझी सध्याच्या प्रोजेक्टमधली teammate तिला पण आमच्या कंपनीने काढुन टाकलं... डोकं गरगरायला लागलं.. डोक्याला हात लावुन बसलो होतो...

संध्याकाळी ७ नंतर मी माझ्या HR मित्राला भेटायला गेलो तेव्हा ज्याने सेजलला बाहेरचा रस्ता दाखवला तो पण तिथेच होता... अचानकच मी केबिनमधे गेलो.. पाहतो तर काय.. तो जोरजोरात रडत होता... डोळे लाल झाले होते.. नाक आणि गाल पुसुन पुसुन लालबुंद झालेले... म्हणत होता, "नको आहे रे असली नोकरी... काय मिळवलं आपण आज..? त्या लोकांचे शिव्याशाप?... आज जे घडलेय खुपच वाईट झालेय... ज्या मुलांची करिअरची सुरूवात आता कुठे झाली त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्या मुलांना मनाविरुद्ध काढून टाकावं लागतेय... ज्यांचं घर त्यांच्या हातावर चालतं अश्यांचं आपण हातच तोडतोय असं वाटतय... काय सांगतील ते आपल्या आई-वडिलांना, त्यांच्या बायका-पोरांना...? काही लोकांची ही नोकरी म्हणजे सर्वस्व होतं.. त्यांच्या कमाईवर सगळं घर चालवतात.. कसे चालवणार घर आता?....... त्यांचे रडणं आता बघवत नाही आहे रे... बस्स झालं आता" तो हमसुन हमसुन परत रडु लागला...

माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं ..I realized, 'It was tough day for that man...Indeed..!' . त्याला काही न बोलताच तिथुन हताश मनाने परत गेलो.

आठवड्याच्या ज्या एका दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत असतो असा तो शुक्रवार एक काळा दिवस बनून राहिला... It was a Black Friday...!! अरेरे

Comments

Anonymous said…
Hi dude! wonderful job... mast lihal ahes...fantastic... chhan ahe ...ekdam kaljat hat ghalanare... keep it up.
Saili said…
Well... this is what is happening... but things will get better... just stay below the radar is all I can say...
Sandy said…
Agadi Satya Katha ahe asa vatala vachun..ur writing skills are improving day by day :)
Somnath said…
Hi Yogya! mast lihila aahes lekh..
pan faarach serious aahe re! :-(
tension detoys yaar....
pan lekh sahich aahe.Ajun thoda effective lihita aala asta...but i can understand that, this is a blog not a story!
I initially thought it to be related to terrorism(may be b'coz the title is Black Friday)

Pudhachya blog sathi Shubheccha!!
Yogesh said…
Somya.. tension nako gheus...As Saili said, just stay below the radar...
aapan kahi karu shakt nahi... ab sub kuch upar waale ke haath main.. ;)

Sandy dada... arre hee satya kathach aahe.. thodya faar farakaane..

Baaki sagalyaana dhanyawaad.. for ur encouraging comments.
Anonymous said…
jhakass blog re.....asach continue karat raha!....changla vatla baryach divsanni tuza blog vachayla....
Anonymous said…
Hi Yogesh….

Me vachala lekh… mast lihila aahes re… chaan…. Kharach ekdum satya katha vatati aani te vachatana feel pan hote….

Kharach dolyt tachkan pani yete….
Unknown said…
Hi Yogesh,
Really a very nice blog. keep it up.
Anonymous said…
Dude !!!

Really wonderfool..

Ekhadya director la story sangitalis tar nakki ek movie nighel ....

tasahi aajachy bollwod movies na subject nasato.... :)

this is is a good topic....

Lihit raha....

Regards,
Deepak Chavan.
Anonymous said…
*bollywood
Anonymous said…
Nice Blog... Dolyasamor ubha rahila to divas... :(

Popular posts from this blog

पाऊस

विज्ञान काय सांगतं A1 आणि A2 दूधाबद्दल? What science tells you about A1 and A2 milk?

भूत