"जाहीर निषेध" म्हणे !!
परवा एका मित्राने व्हाट्सएप्प ग्रुपवर एक पोस्ट टाकली...त्यामध्ये एक फोटो होता ज्यामध्ये 'उरी' येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत भारतीय जवानांवर केलेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्यावर 'जाहीर निषेध' करणारी काही मंडळी होती..
खूप इंटरेस्टिंग फोटो होता... २७ लोक होती त्यामध्ये फक्त एका महिलेचा समावेश होता... काही लोकांचे चेहरे असे होते कि "काय चाललंय काय माहित"... काही जण फोटो सेशन आहे म्हणून जमा होते आणि काहीजण "वडापाव किंवा मिसळ कधी मिळणार" असा अविर्भाव चेहर्यावर घेऊन होते...
पण होर्डिंग बघून डोक्यात कळ गेली... आणि प्रश्न पडला कि "या लोकांना काही अकला आहेत कि नाहीत?", कसली पोस्टर घेऊन तुम्ही निदर्शन करताय याच काही भान आहे कि नाही ...
सुरवातीला "जाहीर निषेध " ... ओके ठीक आहे... पण त्यानंतर मोठया ठळक अक्षरात पहिल्यांदा "मोदी सरकारचा जाहीर निषेध" आणि मग त्यांनंतर "पाकिस्तानचा जाहीर निषेध"?
प्रश्न: आधी मोदी सरकार आणि त्यानंतर पाकिस्तानचा निषेध का? आधी पाकिस्तानचा निषेध आणि त्यानंतर सरकारचा निषेध का नाही?
यावरून कळतं की या निदर्शनाला आलेली लोकं ही स्वतःहून आली आहेत कि त्यांना जबरदस्तीने आणलेय कि या निदर्शनामागे काही राजकीय हेतू घेऊन आलेत...
राजकीय हेतू नसता तर त्यांनी सरकारला टार्गेट करण्याऐवजी फक्त त्या हल्ल्याचा निषेध केला असता..
इथेच खरा फरक आहे. फ्रान्समध्ये जेव्हा अटॅक झाला होता तेव्हा तिथल्या सगळ्या राजकीय पक्षांचे लोकं एकत्र आली होती.. ते त्यांच्या पंतप्रधानांचा निषेध करत बसले नव्हते.. आपली लोक वाट बघत असतात कुठे बॉम्ब पडतो.. कुठे आतंकवादी हल्ला होतो.. म्हणजे लगेचच राजीनामा मागता येईल .... निदर्शने करता येतील..
मी अस म्हणत नाही कि सध्याचं सरकार लै भारी आहे.. सगळे राजकारणी सारखेच (संधीसाधू ).. पण आपण सामान्य नागरिक डोक्यावर पडल्यासारखं वागतो... आणि सगळी कामं धंदा सोडून असली निदर्शने करतो.. युद्ध करा म्हणायला सोप्प आहे .. पण त्याचे परिणाम काय होतील हे निदर्शन करा म्हणणारा किंवा करणारा सांगतो का?
युद्धाचे परिणाम जाणून घ्यायचे असतील तर १०वीचं इतिहासाचे पुस्तक वाचा .. म्हणजे कळेल ... सध्याचं ताज उदाहरण पाहिजे असेल तर सीरिया, अफगाणिस्तान, इराक मधली परिस्थिती बघा... तिथले राजकीय मंडळी असलीच होती.. त्यांना युद्धच पाहिजे होते... त्याचा परिणाम काय झालाय तुम्ही बघतायच ...
आपल्याकडं खूप इंटेलिजन्ट माणसं आहेत.. त्यांना वेळ दिला पाहिजे..
परिस्थिती बघा .. तुमचं स्वतःच डोकं लावा... मगच निदर्शने करा... वाटलं तर बॉर्डरवर पण जा...
असो !!!
-योगेश
P.S. "जाहीर निषेध म्हणे"

Comments