भूत
काही दिवसांपूर्वी एक हॉरर पिक्चर बघितला "१४०८" ... पिक्चर रात्री कोणी घरी नसताना १२ ला चालू केला... बघू म्हटलं आपण किती धाडसी आहोत ते.... लाईट बंद केला... सगळीकडे अंधार आणि भयान शांतता... आणि मी पिक्चर सुरू केला... पिक्चर चालू करून १० मिनिटे पण झाली नसतील मी लगेच लाईट ऑन केला घाबरून... भयानक होते ते सगळं... भूत, प्रेत, रक्त, 'झी हॉरर शो'मधलं काळं मांजर आणि मराठी पिक्चरमधे दाखवतात ती कोल्हेकुई... बाप रे... It was really scary!! पण एक मात्र आहे मी पिक्चर बघून complete केला and at last I proved I am brave yeeeeee ;)
पिक्चर संपला पण मला झोप येत नव्हती... लहानपणी पाहिलेलं पहिलं भूत आठवत होतं... वय वर्षे १२... त्यादिवशी शनिवार होता... सकाळची शाळा... शाळेतुन ११ वाजता घरी परत... मामाने लगेच शेतावर पाठवले आजोबांसाठी जेवण घेउन... शेताकडे जाताना रस्त्यावर एक थडगे येतं.... माझ्या मित्राने मला सांगितलं की त्यामधे एक पांढरे केस असणाऱ्या म्हाताऱ्या बाईला पुरलं आहे... रस्ता असा होता की तुम्हाला त्या थडग्याला वळसा घालावा लागायचा... मी आणि माझा मित्र दोघेही थडगं बघून पळत सुटलो शेताकडे... आजोबांना जेवण दिले... पण घरी परत येताना एक दुसऱ्या लांबच्या पायवाटेने घरी परत आलो ते थडगं रस्त्यामधे येतं म्हणुन.....
संध्याकाळी नेहमीप्रमाणे आम्ही गल्ली क्रिकेट खेळत होतो... ६.३० झालेले... आज्जीने हाक मारली... मी घरात गेलो... मामा चहा पित होता... मामाने विचारले,"सायकल देतो फिरवायला... शेताकड़ं जाणार काय?" सायकल म्हंटल्यावर मी एका पायावर तयार... मामा म्हणाला की अण्णा ना बॅटरी द्यायला शेतावर जायचे आहे... मी म्हणालो ठीक आहे जातो.... त्यावेळी सायकल मारायची लई हाउस... बॅटरी घेतली, खांद्याला लटकवली आणि अर्धा पॅडल सायकल मारत शेताकडे सुटलो... लहान होतो त्यामुळे मला फ़क्त खालुनच सायकल मारायला यायची... संधिप्रकाश होता... थडग्यापासुन जाताना काही भीती नाही वाटली... शेतावर गेल्या गेल्या अण्णा ना हाक मारली.... हातामधे खोरं आणि चिखलात बरबटलेले पाय घेउन अण्णा उसाच्या शेतातून बाहेर आले... अण्णा ना बॅटरी दिली... मी म्हणालो,"मी थांबू की जाऊ?"
अण्णा,"जाशील एकटा?"
"हो... जाईन की"
"शेताला पाणी पाजून २ तासात होईल... तू निघ... मी येतो थोड्या वेळानं"
"बरं! ठीक हाय ... मी जातो मग"
"जा नीट.... अंधार हाय.... घाबरणार नाहीस ना?"
मी काही बोललो नाही... आणि सायकलला पॅडल मारला... शेतासाठी जो पाण्याचा ओघळ येत होता त्या पाटात मी सायकल घुसवली... सायकलच्या चाकाने पाणी बाजुला उडताना बघताना मज्जा येत होती... थोड्यावेळात गावाकडच्या रस्त्याला लागलो.... रात्री पायवाटेने सायकलने जाणे शक्य नव्हते म्हणुन थडग्याच्या रस्त्याने घरी जाणे भाग होतं...
सायकलचा खडखडनारा आवाज आणि रातकिड्यांची चमचम एवढेच काही दिसत आणि ऐकू येत होतं.... गावाकडे जाणारा रस्ता उतरनीचा होता... मला माहीत होतं थोड्या वेळाने ते थडगं समोर येणार होतं....या विचाराने मी जोरजोरात पॅडल मारत होतो... घसरत होती तरी पण सायकलचा वेग वाढवत होतो....काही क्षण आणि ते थडगं आणि मी समोरासमोर येणार होतो... ह्रदयाचे ठोके जोरात पडत होते.... घाम कानपटीवरून खाली येत होता... ते थडगं समोरच होतं.... काय माहीत... तिथे काहीतरी पांढरं दिसत होतं... मी थरथर कापत होतो.... त्या पांढऱ्या आकृतीकडं न बघता मी थडग्याला वळसा घातला आणि जीव मुठीत घेउन जोरजोरात पुन्हा पॅडल मारू लागलो.... सायकलचा वेग खुपच होता.... मी थडग्याला मागं टाकलं न तोच माझे पाय कोणीतरी पकडले... मी जोर देऊन सायकलचा पॅडल पुढे रेटन्याचा प्रयत्न करत होतो पण सगळ मध्यंतरीच अडकलं होतं... अचानक माझे पाय बधिर झाले.... मला पॅडल मारता येत नव्हतं... अचानक सगळं थांबलं... वारा थांबला... माझ्या सायकलचा वेग मंदावला.... जीवाच्या आकांताने मी पॅडल मारायचा प्रयत्न करत होतो... पण व्यर्थ...! सायकल हळु हळु ओढ्यापर्यंत गेली... तिथून गाव मला दिसू लागलं..... मी एक जोरात बोँब मारली.... ती बोँब ऐकून ओढ्याच्या काठाला २ नम्बराला बसलेला पांड्या बोलला..."काय झालं रं?"
मी ओरडलो,"कोण हाय ते??"
पांड्या,"अरे मी हाय... काय झालं कोकलायला?"
"काय नाय"
एका माणसाचा आवाज ऐकून मला हायसे झालं... माझे बधिर पाय सुटले गेले.... मी पुन्हा एक प्रयत्न केला तर मला सायकलचे पॅडल मारता येऊ लागले.... मी पांड्याकड़े लक्ष दिलं नाही (त्याच्याकडं बघायला लाज पण वाटत होतीच)... कोणी परत मला बघायच्या आत मी घराकडे धूम ठोकली... सायकल दारात फेकून दिली आणि घरात पळत गेलो... आज्जी भाकऱ्या बनवत होती... माझी अवस्था बघून ती माझ्याकडे घाबरून आली आणि माझा घाम आपल्या पदराने पुसू लागली आणि विचारलं,"काय झालं रं? तू असा भ्याला का हाईस? केवढा घाम आलाय तुला"
मी,"भूत"
"काय भूत भूत करतो हाईस"
मी म्हणालो,"मी आज भुत बघितलं शेतावरनं परत येताना... त्या भूतानं माझं पाय पकडलं... पण आज्जे तसं काय बी नाही हाय..... भुतबीत काय नसतय.... मीच एक पाय पुढं आणि एक पाय मागं मारित होतो सायकलच्या पॅडलला... घाबरून... त्यामुळे सायकल पुढच जात नव्हती... आणि मला वाटलं त्या भुतानच माझं पाय पकडल्यात... आणि मी लई घाबरलो" एका दमात सांगुन टाकलं...
आज्जी,"डोंबाल तुझं... घाबरवलास की तू"
मी,"ही ही ही.... कशी मज्जा केली तुझी!!!"
आज्जीला काय माहीत माझी कशी फाटली होती ती.......!!
-योगेश

Comments
but it made me laugh in the end...
Really funny..Till end I was not able to predict what will be the end.
I know better.. Tula kiti gham yeto te!! (Chipalu)
Anyways,
Nice Blog.
Andhashraddha nirmulan samiti che Karyakarte Atak Kartil re....
Germany t yeun. ha ha ha.
Nice one.
Deepak Chavan.
mala ti cycle aavadli..
(aardha pandel wali..)
manasan dhadasi asav ter majyasarakha.:)
Aaj tuza blog vachala..
masta interesting aahe hi goshta..
Keep writing such good stuff :-)
but 1408 baghtana tuzi evdhi faatli??hehehe