आब्या...

असाच एक घडलेला किस्सा कालच माझ्या रूम पार्टनर्सना सांगितला... वाटलं तुमच्याशीही share करावा...
त्यावेळी मी सातवीत होतो... मामांच्या गावापासून किमी अंतरावर असणाऱ्या सडोली गावाच्या हाइस्कुलमधे शिकत होतो... संध्याकाळचे .३० झाले होते... शाळेतुन मी जस्ट घरी पोचलो होतो.... सायकल असल्यामुळे लवकर पोचलो... सायकल स्टँड वर लावली आणि घरात जाण्याऐवजी मी घरासमोरच्या कट्ट्यावर बसलो... तो पर्यंत आमचा शेजारचा आब्या (म्हणजे अभिजीत)आला...

आब्या... एक नम्बरचा कार्टून...!!! आगाऊ... कोल्हापुरी भाषेत सांगायचे झाले तर एकदम वांड पोरगा... वर्षाचा होता पण करामती करण्यात पटाईत... नाकाचा शेंडा नेहमी काळा... दिवसभर मातीत आणि गटारात खेळायचा... एकदा त्याला मी गटारातुन बाहेर काढले तर त्याने उलटी बोंब मारली आणि त्याच्या
आईने घरातुनच एकदम अस्सल गावरान शिवी हासडली मला...
"अरे कोण हाय तो माझ्या सोन्याला रडवतोय... त्याला "Beeeeeeeeeeeeep" झालं ते....!! " (शिव्या censored केल्या आहेत (: ) पिक्चरमधे दाखवतात तस्सा मी एकदम तिथून
गायब झालो त्याची आई घराबाहेर यायच्या अगोदर... ठरवलं एकदा या आब्याची चड्डीच गायब करायची...!!

तर आब्या घरातून बाहेर आला... बघतो तर काय... आब्याचा एकदम अभिजीत झाला होता... म्हणजे स्वच्छ कपडे... पायात चप्पल... तोंडावर ओघळ येईपर्यंत डोक्याला तेल ... पाँड्स ची फासलेली पावडर... आणि
दृष्ट लागू नये म्हणुन चेहऱ्यावर काजळाच्या टिपक्या... एक कपाळावर, एक डाव्या गालावर आणि एक हनुवटीवर...

मी, "काय रे आब्या"
आब्या, " काय नाय"
"एकदम चकचकीत"
तसा आब्या थोड़ा लाजलाच ...!!
आब्या, "ह्म्म्म"
मी, "अगायाया नविन शर्ट ... नविन चड्डी"
आब्या बोबडा बोलला, "आईने आणलीये आमच्या"
"मग मोठा झालास की तू"
"व्हय"
"पण तुला अजुन कपडे घालायला पण येत नाहीत"
"येत्यात की"
"नाही येत तुला"
"येत्यात म्हणजे येत्यात म्हणजे येत्यात"
"अस्स... तर मग शर्ट काढून दाखव बगू"
आब्या,"मी नाही जा"
मी, " म्हणजे तुला शर्ट काढता येत नाय.. "
आब्याने फुर्र्कन शेम्बुड वडला अणि म्हणाला.. "थांब दावतो तुला" आणि हळु हळु शर्टची बटने काढू लागला...
मी,"बघ तुला येत नाही..."
आब्याने सगळी बटने उघडून गप्प बसला आणि माझ्याकडे टरकुन बघू लागला... मी आणखिन थोडं चिडवलं तसा त्याने आपला शर्ट हातात पकडला... उघडा बंब आब्या... त्याचं नाक ओढ़णं चालूच होतं...
मी माझ्या खिशातला हातरुमाल काढला आणि वरती पकडून गोल गोल फिरवू लागलो... आणि म्हणालो, " आब्या बग, तुला असं फिरवता येतय काय??"
आब्याने आपला शर्ट वरती पकडून हवेत फिरवायला सुरवात केली... मी जसं करेन तसा तो करू लागला... आणि एका क्षणाला मी हातरुमाल हवेत फेकून दिला... आब्याने पण आपला शर्ट हवेत भिरकावून दिला... त्याचा शर्ट मस्त उडत उडत घराच्या छपरावर गेला... आणि खापऱ्यामधे अडकला...
मी त्याच्याकडे बोट करून जोरजोरात हसू लागलो... गल्लीतली पोरं सगळी आब्याकडे बघून ओरडायला लागली... तसा आब्याने मोठ्याने बोंब मारली... "आयेएएएएएएएएएएए माझा शर्ट...." आणि
नेहमीसारखी मातीत लोळायला सुरवात केली.....
आब्याचं रडणं ऐकून त्याच्या आईने आतून दंगा चालू केला... "कोण हाय तो Beeeeep, ज्याने माझ्या सोन्याची खोड काढली... Beeeeeeeeeeeep झालं त्याला... त्याला नेला खडकावर"... शिव्यांचा अगदी शब्दकोष उलघडत होता...
आब्याची आई घराबाहेर यायच्या अगोदर मी नेहमी सारखा पिक्चर मधे गायब होतात तसं अगदी पुन्हा एकदा गायब "टिंग".....
- योगेश

Comments

Anonymous said…
hmmmmmm....good attempt.
अदिती said…
humm.... changla lihita ki tumhi
aavadla. lihit raha
baki ribecca pustak vachaychya aivaji picture baghaychi idea aavadli mala :) tyatun alfred hichkok cha pic mhanaje sahich.....
thanks for reading my pareexan........
Unmesh said…
Yogya saahi lihila aahes !! ekdum gavran bhashet ! Pardeshat rahunahi aplya maaticha sugandh tu ajunahi visarala nahis tu ajun he pahun bara vatala !! :D

Asach lihit raha !!
Anonymous said…
lahapanichi aathvan kas kay aahe tumhala? Amhitar sagl visrun gelo...Good memory...

DK
Anonymous said…
I Think,

Aabyachya jagi tu asawas ani aabya tuzya jagi...ha ha ha ..

anyways sahi aahe LIHAT raha.

SHUBHECHA
Deepak.
Somnath said…
Sahi aahe ekdum !! It's really funny!
Thoda ajun motha lihayala pahije hota...
Ajit said…
Lay bhari... Mi imagine karat hoto... Not that scene but you explaining the scene. Tu tasa khodkar aahes he mahitiye mala. Pan lahanpanapasunch aahes he aatta kalala.... :)

Popular posts from this blog

पाऊस

You spend more time with nature, you do more realise what you miss more...

विज्ञान काय सांगतं A1 आणि A2 दूधाबद्दल? What science tells you about A1 and A2 milk?