आखरी रास्ता
नेहमीप्रमाणे आम्ही ऑफिस मधून दुपारी जेवायला घरी आलो... जेवण ऊरकुन १.२७ ची ७१ नंबरची बस ऑफिससाठी पकडण्यासाठी बस स्टॉपला थांबलो ... काही नेहमी दिसणारे चेहरे तर काही ८-९ महिन्यामधे कधी न बघितलेले चेहरे बस मधे चढ़त होते... मी आपला खोटे खोटे हसत त्या खडूस बस ड्राईवरला बसचा पास दाखवून आतमधे चढलो आणि बाकीच्या चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या लोकांचे निरीक्षण करू लागलो... बस मधे चढणाऱ्यांच्या मधे ६० ते ८० वयाची लोकं जास्त होती जी त्यातली बरीचशी वाटेत येणाऱ्या वृद्धाश्रमात उतरणार होती...
आम्ही आपले शेवटच्या सीट वर बस्तान बसवलं होतं.... आणि नेहमी सारखी मराठीमधे त्या जर्मन लोकांच्या विषयी 'विशेष टिपण्णी' देण्यास सुरुवात केली होती... 'या लोकाना बहुतेक कपड्यांची अॅलर्जी असावी' असा नेहमीचा डायलॉग त्या सुंदर गोऱ्या मुलीकडे बघत मी मारला... सगळे फिदिफिदी हसले पण चंदू (चंद्रकांत) आपला पायावर पाय चढवून गपचुप बसला होता वयस्कर माणसासारखा...!!!
बस चालू झाली पण just चढलेल्या ८० ते ८५ वयाच्या ३ स्त्रीयांपैकी एकाजणीला सीट वर बसता येत नव्हतं... ती तशीच उभी होती... बस ड्राईवर च्या लक्षात ही गोष्ट आलेली नव्हती... त्याने तशीच बस पुढे हाकली... इथल्या बस या without gear असणाऱ्या असल्यामुळे एकदम झपकन पुढे जाते आणि आपल्याला जोरात धक्का बसतो... यावेळी असच झालं... गाडीच्या त्या जोरात धक्क्यामुळे ती म्हातारी बाई धप्पकन खाली पडली...सावरायच्या आताच तिचा हात त्या सीटच्या एका कोपऱ्यात अडकला... सगळ्यांच्या मनात धस्स झालं... ही गोष्ट ड्राईवरच्या लक्षात पुढच्या स्टॉपच्या वेळी आली आणि त्याने गाड़ी थांबवली... आम्ही त्या बाईच्या दिशेने धावलो तिला मदत करण्यासाठी...ड्राईवर धावत येउन तिचा सीटमधे अड़कलेला हात सोडवला... तिचा हात काळपट पडून रक्तबंबाळ झाला होता... Wedding Ring चेपली होती... ड्राईवरच्या मदतीने आम्ही तिला त्या सीटवर व्यवस्थित बसवले... हे सगळं होईपर्यंत बाकीचे सगळे म्हातारे लोक बसमधून उतरले वृद्धाश्रमात जायला...पण तिच्यासोबत असणाऱ्या बाईपैकी कोणीही आपल्या सीटवरुन उठले नाहीत त्या पडलेल्या बाईची मदत करण्यासाठी... मला आश्चर्य वाटलं या गोष्टीची म्हणुन मी त्यांच्याकड़े बघितले... त्या ८०-८५ वय असणाऱ्या स्त्रीया हतबल होत्या हे त्यांच्या डोळ्यावरुन कळालं .... त्यातली एक बाई त्या वृद्धाश्रमाकडे बघत होती तर दूसरी जी खाली पडलेली होती ती त्या वृद्धाश्रमाच्यापुढे असणाऱ्या ग्रेवयार्ड ('स्मशान') कड़े बघत होती... तिचे डोळे म्हणत होते, "वृद्धाश्रम ते स्मशान फ़क्त एक रस्ता ओलांडायचा बाकी आहे... एक शेवटचा रस्ता...!!!"
- योगेश
P.S. वृद्धाश्रम ही जर्मनी मधली खुप common concept आहे... आणि हा वृद्धाश्रम Frankfurter Street, Kronberg वर अस्तित्वात असून त्याच्यासमोर खरोखर एक स्मशान आहे... मधे फ़क्त एक रस्ता...!! खऱ्या अर्थाने एक 'आखरी रास्ता'...!!!!!!!

Comments
Serious Blog!!
Gharoghar 'Rajarani' cha sansaar Bharatat suddha disatoch ki halli.
Pan videshi loka emotionally independent asatat..That is good in a way..
Amruta: Indeed, Our culture is far better than others but now in India it is degrading as said by Sandeep J.
Sandeep J: Thank you for your valuable comment.
Sandeep Chavan: Thnk you bhava
are u all right...
sagle tuzya blog la changala mhanat aahet pan ....
mala mahit aahe ....
fakta mich samju shakto tuza dukkha..
ki tu patni computers sathi kaam karato te...
dusrya konala kalnaar nahi te...
cheers
Amit K
DK
bagh olakhta aala tar mi kon.. :)
Thank you very much for your valuable comments.
Anonymous: Thank you for your comment. Kharach nahi olakhale who are you?
Keep writing ...because we like it. -- KiRaN
Mag aaplya kadche lok tashe changle aahet. Mhatare zale tari poranchya mangutivar basun kay havay te milavtat. Saglech nahi pan barech. Vrudhhashramat jaychi vel jast lokanvar nahi yet...