शेतकरी, कर्जमुक्ती आणि पाणी !



सध्या महाराष्ट्रात शेतकरी कर्जमुक्ती वर बरीच चर्चा, आंदोलनं आणि आरोप-प्रत्यारोप चालू आहेत..  आमच्या गावातल्या व्हाट्सअँप ग्रुपवरची चर्चा (राजकीय उद्देश ठेवून) बघून वाटलं की म्हणावं त्यांना "कुठं नेऊन ठेवलाय मेंदू तुमचा..!"

कुठेतरी वाचलं होतं ... if someone is hungry... Do not give him fish but teach him how to (catch) fish.... एखादा भुकेला असेल तर त्याला मासा खायला देण्याऐवजी मासे कसे पकडायचे शिकवा.... म्हणजे तो कोणावर अवलंबून नाही राहणार...

इतकी वर्षे आपण "दुष्काळ पडतोय,,, बळीराजा मरतोय" असं म्हणतोय पण "दुष्काळ का पडतोय, कारणं काय ... आणि कमी पावसात पण बळीराजा कसा वाचेल" याच्यावर कोणच (except few) कसं बोलत नाही? ... परत एकदा "कुठं नेऊन ठेवलाय मेंदू तुमचा..!"

ग्राउंड लेवल वर काम केले की ते लगेच नाही दिसत... त्याला वेळ लागतो... Root cause शोधून त्यावर उपाय शोधला पाहिजे ना कि One Time बोनस दिला पाहिजे... (IT मध्ये हे वाक्य खूप वापरलं जातं पण इथे हे वाक्य तंतोतंत लागू पडतं ).
पाणी फौंडेशन हेच नेमके करतेय... आणि आताच सरकार त्यांना मदत पण करतंय हे खूप चांगली गोष्ट आहे ...



खूप वर्षांपूर्वी एक TedEx व्हिडिओ बघितला होता.. त्यातून काही...

राजस्थान मध्ये सगळ्यात कमी पाऊस पडतो... पण तिथे लोकं पावसाचा प्रत्येक थेम्ब साठवून ठेवतात.. का? एकच विचार "Water is Center of our life" - पाणी आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे... २००० वर्षांपूर्वीचा टॅटू (गोन्न) राजस्थानी लोकानी त्यांच्या शरीरावर काढून ठेवलंय ... खालील लिंकबघा... इंग्लिश मध्ये आहे पण तुम्ही हिंदी subtitle मध्ये बघाच ...



पाणी संकलन ही आपल्या पूर्वजांनी खूप वर्षांपासून जोपासलेली गोष्ट आहे... शिवाजी महाराजांनी त्यांच्या किल्ल्यावर असे कित्येक विहिरी बांधल्या आहेत ज्या कधीही कोरड्या नाही पडत.. तंत्रज्ञान आजूबाजूलाच आहे... राजकारणाची पट्टी डोळ्यावर न बांधता आणि फक्त राजकारण  फक्त हाच उद्देश न ठेवता जर कामं  केली तर आपला बळीराजा कधीच मारणार नाही.... आणि दुष्काळ तर सोडूनच द्या  ... !

असो.... पटलं तर बघा :-)
-योगेश पाटील
Disclaimer: .These are my own thoughts and not endorsing any political party or any organisation.

Comments

Popular posts from this blog

पाऊस

विज्ञान काय सांगतं A1 आणि A2 दूधाबद्दल? What science tells you about A1 and A2 milk?

भूत